12 December 2024 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

VIDEO - अतिरेक्यांनी आजोबांना ठार मारलं, आजोबा उठतील याची चिमुरडा वाट बघत होता

Jammu Kashmir, sopore shoot, Terrorist, armed forces, child grandfather dead body

जम्मू, १ जुलै : जम्मू-काश्मीरमधील सोपोरच्या मॉडेल टाउनमध्ये आज नाकाबंदी करत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एक जवान शहीद झाला असून इतर ३ जवान जखमी झाले आहेत. अतिरेक्यांच्या या गोळीबारात एक नागरिकही ठार झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजी दिलबाग सिंह यांनी दिली. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर या संपूर्ण भागाला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घेतला असून त्यांनी अतिरेक्यांविरुद्धची शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

दरम्यान, या घटने एका नागरिकाने जीव गमावल्यानंतर एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे. या हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर बसलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा फोटो पाहून मन सुन्न होते. हे त्यांच्या फोटोतील दृश्यातून समोर आले आहे. त्यांता मृतदेह जमिनीवर पडला असून कपड्यांना रक्ताने डाग दिसत असून या मृत माणसाचा एक ३ वर्षाचा नातू देखील तेथे उपस्थितीत असलेला दिसतोय.

हा निष्पाप चिमुरडा आपल्या आजोबांच्या मृतदेहावर अशा प्रकारे बसला आहे की, कदाचित तो त्यांच्या मांडीवर खेळत आहे. मात्र त्या चिमुरड्याला त्याच्या आजोबांना गोळी लागल्याने त्याचा जीव गेला आहे, याची अजिबातही कल्पना नसल्याचे या फोटोवरून लक्षात येत आहे. पण, मृत आजोबा उठतील, याची चिमुरडा वाट बघत आहे.

चिमुरड्याची सुटका केल्यानंतर त्याला त्याच्या आईकडे नेण्यात आलं. जवान मुलाला गाडीतून नेत असतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

 

News English Summary: This innocent kid is sitting on his grandfather’s dead body in such a way that, perhaps, he is playing on his lap. But Kid is waiting for the dead grandfather to rise.

News English Title: Jammu Kashmir sopore shoot out terrorist armed forces child grandfather dead body News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x