4 August 2020 1:25 PM
अँप डाउनलोड

भाजपवरून ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यात खडाजंगी

Jammu kashmir, Article 370, omar abdullaha, mehbooba mufti

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यात भाजपावरून बाचाबाची झाली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांना हरि निवास महल येथे येथे नजरकैदेत ठेवलं आहे. यादरम्यान भाजपाला जम्मू-काश्मिरात कोणी आणलं? यावरून दोघांमध्ये वादाला ठिणगी पडली आहे. दोघातील वाद ऐवढा विकोपाला गेला की अब्दुल्ला यांना तेथून अन्यत्र हलवण्यात आले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ताब्यात घेतलेलं असताना उमर अब्दुला यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आगपाखड केली. मेहबूबा यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी २०१५ आणि २०१८ मध्ये भाजपाशी आघाडी केल्याने भाजपा राज्यात पाय रोवू लागली. या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार धुमचक्री पाहायला मिळाली. त्यावेळी तिथे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. पीडीपी चीफ मेहबूबा मुफ्ती यांनीही उमर अब्दुला यांनाही जशास तसे उत्तर दिले.

मेहबुबा यांनी अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर केलं. अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांनीही अटल बिहारी वाजपेयी सरकारसोबत एनडीएत जाणं पसंत केलं होतं. दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे अखेर ओमर अब्दुल्ला यांना महादेव पहाडीजवळ चष्माशाही येथे वन विभाग भवनात हलवण्यात आले आहे. हरि निवासात दोघंही वेगवेगळ्या मजल्यांवर होते. दोघांनाही त्यांच्या पदांनुसार आणि तुरुंगाच्या नियमानुसार जेवण दिले जात आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Kashmir(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x