23 March 2023 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, श्रमिकांसाठी अजून २६०० ट्रेन धावणार - रेल्वे मंत्रालय

laborers migrate, lockdown

नवी दिल्ली, २३ मे: देशात ४ कोटीपेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतर करतात. या मजुरांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रोज २०० रेल्वेगाड्या धावत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या स्थलांतरीतांचे समुपदेशन करून त्यांना श्रमिक ट्रेनने (Shramik Special Train) जाण्याची विनंती करावी अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत, आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत (Migrant) आपल्या गावी पोहोचले आहेत. तर आणखी २६०० ट्रेन धावणार असल्याची माहिती आज केंद्रीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडून आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.

१ मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या. आतापर्यंत २६०० ट्रेन सोडण्यात आल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत आपल्या गावी रवाना झाले आहेत. या प्रवासात पाणी आणि जेवणाची मोफत सुविधा देण्यात आली आहे. प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातात. राज्यांकडून प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग केली जात असून ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत, त्यांनाच प्रवासाची मुभा दिली जात आहे. तसेच, आतापर्यंत ८० टक्के ट्रेन उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सोडण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्रात याच विषयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यास केंद्राचा विलंब झाला असला तरी कोरोना संसर्गाचा संयुक्तिक विचार करून रेल्वे सोडण्यात आल्या. अश्यावेळी एकमेकांवर जबाबदारी झटकण्या पेक्षा कोरोना संसर्ग नजरेसमोर ठेऊन राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत असते असे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे . राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही, त्यांची व्यवस्था करू शकले नाही म्हणून लोकं पायी निघाल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

News English Summary: More than 4 crore laborers migrate for employment in the country. 200 trains run daily for these laborers to reach their native village. State governments have been instructed to advise the road migrants and request them to board the Shramik Special Train.

News English Title: More than 4 crore laborers migrate for employment in the country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x