5 May 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | 67 टक्के कमाईची संधी; या बातमीनंतर पेनी स्टॉकची जोरदार खरेदी सुरु - NSE: IDEA Adani Green Share Price | अप्पर सर्किट हिट, अदानी ग्रीन शेअरमध्ये तुफान तेजी, टार्गेट जाणून घ्या - NSE: ADANIGREEN Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
x

नोटबंदी आणि जीएसटीमुळेच देशात आर्थिक मंदी: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी

GST, demonetization, PM Narendra Modi, Central MInister pratap chandra sarangi

नवी दिल्ली: सध्या देशभरात मंदीवरून वातावरण ढवळून निघालेलं असताना त्यात सत्तेतील मंत्री देखील मोदी सरकारला अडचणीत टाकत आहेत. देशभरात अनेक उद्योग एकामागे एक बंद पडत चालले आहेत. आता पर्यंत लाखो लोकांनी त्यांचा रोजगार गमावला असून रोजच्या उपजीविकेचं साधन देखील हिरावलं गेलं आहे. वाहन उद्योग आणि वस्त्रोद्योग उद्योगाचे तर तीन तेरा वाजल्याचं चित्र आहे आणि दुसरीकडे बांधकाम क्षेत्र देखील खप नसल्याने डबघाईला आलं आहे.

दरम्यान, देशभरातील विरोधकांनी नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना जवाबदार धरून तेच मंदीचं मूळ कारण असल्याचं म्हटलं आहे. सरकार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आकड्यांची लपवालपवी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि त्यात केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून सरकारचं बिंग देखील फुटलं आहे. देशाच्या जीडीपीत पहिल्या तिमाहीत प्रचंड घट झाली आणि तो थेट ५ वर येऊन कोसळला आणि सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची पोलखोल झाली.

त्यात सर्वाधिक दोष हा घाईघाईत अमलात आणलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयाला दिला गेला. नोटबंदी आणि जीएसटी ही देशातील आर्थिक मंदीची प्रमुख कारणे असल्याचे, देशातील सर्वसामान्यांनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनेच मान्य केले आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील इचावार येथील केंद्रीय ग्रामोद्योग आयोगात तपासणीसाठी आलेले केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

देशात आलेल्या आर्थिक मंदीला मोदी सरकारने घेतलेले निर्णय कारणीभूत असल्याचा आरोप आतापर्यंत विरोधकांकडून होत होता. मात्र आता मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले प्रतापचंद्र सारंगी यांनी सुद्धा, देशातील आर्थिक मंदीला नोटबंदी आणि जीएसटी कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या