2 May 2024 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

सुशांत प्रकरण: बिहार सरकारकडून तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस

Sushant Singh Rajput, Death Case, Bihar CM Nitish Kumar

पाटणा, ४ ऑगस्ट : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवं वळण मिळालं आहे. सुशांत सिंहच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप सुरू असून, बिहार सरकार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलीस महासंचालकांनी सुशांतच्या वडिलांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली. त्यामुळं आता आम्ही या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करत आहोत.’

दरम्यान, सीबीआय तपासाची मागणी होत असतानाच दुसरीकडे बिहार पोलिसांकडून सुशांतचा मित्र आणि क्रिएटीव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिथलानीचा जबाब नोंदवला आहे. याव्यतिरिक्त सुशांतचे मॅनेजर दिपेश सावंत आणि इतर दहाजणांचा जबाब बिहार पोलिसांनी नोंदवला आहे.

सुशांतसिंहने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील घरात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्याच्या आत्महत्येचा कारणांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत असून, काही दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी देखील होत आहे. मात्र, राज्य सरकारनं त्याला नकार दिलेला आहे. मात्र, बिहार सरकारनं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: Actor Sushant Singh Rajput suicide case has now taken a new turn. Sushant Singh’s investigation has led to allegations between the Mumbai Police and the Bihar Police, and the Bihar government has recommended that the matter be referred to the CBI.

News English Title: Sushant Singh Rajput Death Case Bihar CM Nitish Kumar Recommends CBI Probe News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x