19 January 2022 1:56 AM
अँप डाउनलोड

तरुणांना बॉलिवूडची कोडी सोडवण्यात रस | त्यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष - चेतन भगत

Indian economy, Writer Chetan Bhagat, Modi Govt, Marathi News ABP Maza

मुंबई, १४ सप्टेंबर : देश सध्या अतिशय मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र या संकटाकडे देशातील तरुणांचं लक्ष नाही. नागरिकांनी अशाच प्रकारे देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लत्र केल्यास देशाची अवस्था आणखी बिकट होईल, असं मत प्रसिद्ध लेखक चेतन भागात यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि त्याकडे जनतेचं होत असलेलं दुर्लक्ष याबद्दल आपली परखड मतं व्यक्त केली.

‘देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. लोकांना अर्थव्यवस्थेची काळजी नसल्याचं सरकारला माहीत असतं. त्यामुळेच सरकारदेखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करत नाहीत. लोकच ढासळलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत नसतील. त्यांनाच काळजी नसेल, तर मग राजकारणी तरी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?,’ असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे.

ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीवरही चेतन भगत यांनी भाष्य केलं. ‘पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एक तर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल,’ असं भगत म्हणाले.

दरम्यान, पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. भारताचा विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण आहे. याबाबत मी अगोदरच इशारा दिला होता. परंतु, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होतं.

एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.

 

News English Summary: At a time when India is going through an unprecedented financial crisis, author and columnist Chetan Bhagat said that the country will suffer more if citizens continue to ignore the present economic situation. In an exclusive conversation with India Today TV, author and columnist Chetan Bhagat criticized the country’s citizens including the youth who seem busy “solving Bollywood cases” and are not concerned about the economy at all.

News English Title: Politicians would not care about economy if people do not says writer Chetan Bhagat Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Chetan Bhagat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x