4 May 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

लोकसभा २०२४ | प्रशांत किशोर यांची राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसोबत महत्वाची बैठक

Prashant Kishor

नवी दिल्ली, १४ जुलै | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.प्रियंका गांधी यांना आज (१३जुलै) ला लखनऊला जायचं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांच्यासोबत अचानक मिटिंग ठरल्याने लखनऊचा दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर आज प्रशांत किशोर राहुल गांधी आणि प्रियंका यांना भेटले. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनिती आखण्यात मदत करतात. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीमध्येही ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी साठी प्रशांत किशोरयांनी रणनिती आखली होती. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) या निवडणूकीत २१३ जागांवर विजय मिळाला आहे. बंगालमध्ये भाजप टीएमसीमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली होती परंतु प्रशांत किशोर यांनी भाजपला १०० पेक्षा जागा मिळणार नसल्याचे सांगितले होते तसेच १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर काम सोडेन असाच इशारादिला होता.

या बैठकीत २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२४ मध्ये भाजपाला पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व विरोधी पक्षांना दुवा साधण्याचं काम सध्या प्रशांत किशोर करत असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतची बैठकही यानुषंगाने महत्त्वाची मानली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Prashant Kishor and Rahul Gandhi discussed over loksabha election 2024 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या