महाबलीपूरमः पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छता मोहीम राबवण्यसाठी ते स्वतः रस्त्यावर उतरताना अनेकदा दिसले आहेत. आज पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर कचरा दिसताच मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली. मोदी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करीत सार्वजनिक स्थळावर सर्वांनी कचरा करू नये, स्वच्छता राखल्यास आरोग्य चांगले राहते, असे लोकांना आवाहन केले.

पंतप्रधान मोदी महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. जवळपास अर्धा तास मोदी यांनी समुद्र किनाऱ्यावर कचरा गोळा केला. प्लास्टिकची पाकिटं, बाटल्या आणि इतर कचरा मोदींनी गोळा करून साफसफाई केली आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी मोदी आणि शी जिनपींग यांनी महाबलीपूरम येथील ऐतिहासिक मंदिरांमध्ये भटकंती केली. मोदींनी या वेळी तमिळनाडूचा पारंपरिक वेश परिधान केला होता तर जिनपिंग पांढरा शर्ट आणि काळी पॅण्ट अशा औपचारिक पेहेरावात होते. पंत रथ या नयनरम्य परिसरात भर दुपारच्या उन्हात दोन्ही नेत्यांना नारळ-पाण्याचा आस्वाद घेत अल्पकाळ चर्चा केली.

VIDEO: फेरफटका विथ कॅमेरा! मोदींनी केली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता