21 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल?
x

देशविरोधी वक्तव्यं भोवलं! जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक

JNU Student Sharjeel Imam, CAA

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. त्याआधी पोलिसांनी सोमवारी रात्री शरजील इमामचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.

शरजील इमामनं देशद्रोही विधान केल्यानं तो चर्चेत आला होता. त्यानं ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शरजीलच्या विरोधात देशद्रोह आणि धार्मिक तेढ वाढवण्यासह अनेक गंभीर आरोप करत अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल केलं गेलं होतं. त्याला मंगळवारी बिहारच्या जहानाबादमधून अटक करण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.

शरजील इमामचा शोध गेल्या दोन दिवसांपासून सुरु होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथकंही तयार केली होती. एवढंच नाही तर मुंबई, पाटणा आणि दिल्लीत काही ठिकाणी छापेही मारण्यात आले होते. आता आज शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. जेएनयूचे मुख्य प्रॉक्टर धनंजय सिंह यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजीलला ३ फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते.

शर्जीलविरुद्ध दिल्लीसह बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर अशा एकूण सहा राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मात्र शर्जील हाती लागला नव्हता.

 

Web Title:  Delhi police arrested JNU student Sharjeel Imam Booked in Sedition Case from Jahanabad in Bihar State.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x