नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या मुलाखतीत बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा तसेच ई-मेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरुन पंतप्रधानांवर मोठ्या प्रमाणात टीका होत करण्यात येते आहे. परंतु, या संपूर्ण मुलाखतीचं कथानक आधीच तयार होतं आणि त्यातील प्रश्न देखील ठरवून विचारण्यात आले, असा थेट आणि गंभीर आरोप मोदींवर काँग्रेस आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर व्हिडिओ द्वारे मुलाखत आधीच फिक्स करण्याचे आरोप होत आहेत.
काँग्रेसच्या समाज माध्यम प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओद्वारे मोदींच्या मुलाखतीचे प्रश्न आधीच ठरले होते असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय स्पंदना यांनी, ‘आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत’ असा सणसणीत टोला देखील लगावला आहे.
व्हायरल व्हिडिओत मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे, तसंच ‘सवाल संख्या २७’ असंही लिहिलेलं दिसतंय. कवितेच्या वरती काही प्रश्न लिहिलेले दिसतायेत आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते अशी टीका मोदींवर केली जात आहे. दिव्या स्पंदना यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लोकांना हा व्हिडिओ पाहताना तिसऱ्या सेकंदाला व्हिडिओ पॉज करण्याचं आवाहन केलं आहे. ‘व्हिडिओ पॉज केल्यावर कागदावर लिहिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरंही दिसत आहेत…आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत’…असा टोलाही स्पंदना यांनी लगावला आहे.
Here’s what you’d see- question no 27. Unfortunately for Modi, it wasn’t cloudy, the radar picked this up ???? pic.twitter.com/aRiEUgPdaB
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 12, 2019
Here’s what you’d see- question no 27. Unfortunately for Modi, it wasn’t cloudy, the radar picked this up ???? pic.twitter.com/aRiEUgPdaB
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 12, 2019
