नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. डिटेक्शन सेंटरबाबत काँग्रेस वाईट हेतूने लोकांमध्ये खोटे पसरवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत बोलताना म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

आसाममध्ये गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) निर्माण केली जात असून यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसून काँग्रेस करत असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता.

राहुल गांधी यांनी बीबीसीने स्थानबद्धता छावणीसंबंधी केलेला रिपोर्ट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

 

Web Title:  Rahul Gandhi Twit video of Detention centers Development in Assam State.

मोदी खोटं बोलत आहेत; आसाममध्ये स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) उभारणी: राहुल गांधी