देश तुमच्यासोबत, पण सत्य काय आहे? काहीतरी बोला - संजय राऊत

मुंबई, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
चीन सीमेवर शहीद झालेल्या २० जवानांची नावे आज सैन्य जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून सीमेच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)वर विश्वासघात करत चीनी सैनिकांनी भारतीय जवांनावर हल्ला केल्यानंतर आता चीन चर्चेने तणाव कमी करण्याची गोष्ट बोलू लागला आहे. चीनमधीले एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, चीनी सैनिकांचे प्रवक्त्याने म्हटलं आहे की, ‘भारताने त्यांच्या सैनिकांना सख्तीने रोखलं पाहिजे. चर्चेच्या मार्गावर आलं पाहिजे.’
लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० जवान हुतात्मा झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारला जाब विचारला जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले २० जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीननं भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचं आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात… तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद,” असं ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचं आवाहन केलं आहे.
चीन के मुंहजोरी को कब मिलेगा करारा जबाब?बिना गोली चले हमारे 20 जवान शहीद होते है.हमने क्या किया?
चिनके कितने जवान मारे गये? चीन हमारे जमीन पर घुस गया है क्या?प्रधान मंत्रीजी इस संघर्ष के घडीमे देश आपके साथ है लेकीन सच क्या है?
बोलो.कुछ तो बोलो. देश सच जानना चाहता है.
जय हिंद!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
News English Summary: Opposition is demanding an answer from the Modi government after 20 soldiers were killed in a clash in Galwan valley in Ladakh. Shiv Sena leader MP Sanjay Raut has also tweeted in this regard. “When will China’s infiltration get a fair response?” 20 of our soldiers have been martyred without firing.
News English Title: Shiv Sena MP Sanjay Raut Raise Question To Pm Narendra Modi About Border Clashes News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA