26 September 2020 7:28 PM
अँप डाउनलोड

लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळणे आमचा अधिकारच : संजय राऊत

Sanjay Raut, Shivsena

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक विजयात बहुमताचा आकडा पार करत भारतीय जनता पक्षाचे ३०३ खासदार निवडणून आले, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आले. त्यामुळे एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा सर्वाधिक विजयी खासदार असलेला पक्ष ठरला. परंतु त्यांना केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ते देखील अवजड उद्योग खाते. यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यातच आता शिवसेनेने लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. ‘एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपद मिळणे आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद आम्हालाच मिळाले पाहिजे’, असे संजय राऊत यांनी म्हटले.दरम्यान, खासदारसंख्या पाहता लोकसभेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे राहील. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(134)#Shivsena(922)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x