राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन

नवी दिल्ली, २१ एप्रिल: कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल १८ हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर इथे काम करणाऱ्या किमान १०० लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण. गेट क्रमांक ७० येथे राहणाऱ्या किमान १२५ कुटुंबांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
(Source ANI)#coronavirusinindia pic.twitter.com/9HwIevBKoQ
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 21, 2020
गेट क्रमांक ७० येथे राहणाऱ्या किमान १२५ कुटुंबांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे, अशीही माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे, मंगळवार सकाळपर्यंत दिल्लीत हा आकडा २५०० च्या आसपास पोहोचला होता. दिल्लीत कंटेनमेंट झोनची संख्याही वाढवण्यात आली आहे ही संख्या ७९ वरुन ८४ करण्यात आली आहे.
News English Summary: An employee at the Rashtrapati Bhavan has been quarantined by at least 100 people working here after reports of a coronary virus infection, sources in the ANI news agency reported.
News English Title: Story 125 families in quarantine after Covid19 case emerges in Rashtrapati Bhavan Corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH