स्वयंशिस्त, प्रशासनाला मिळालेल्या नागरिकांच्या सहकार्याने केरळात रुग्णसंख्या नियंत्रणात

थिरुअनंतपूरम, १३ एप्रिल: भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे.
या परिस्थितीत ओदिशा, पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांनी लॉकडाऊन वाढवणार असल्याचं अगोदरच जाहीर केलं आहे. केंद्र सरकारही सध्या सुरू असलेलं २१ दिवसांचं लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे. पण राज्यांचं लॉकडाऊन असतानाही केंद्राच्या लॉकडाऊनची काय गरज? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला देशात अशी परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असली तरी केरळ’मध्ये दुसरं चित्र पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्यामध्ये प्रतितबंधात्मक उपाय, सतर्कता आणि निर्देशांचं पालन करत आता केरळ या राज्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे. काल केरळमध्ये कोरोनाचे फक्त २ नवे रुग्ण आढळले. तर, ३६ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्येच असल्याचं उघड झालं होतं. ज्यानंतर मुख्यमंत्री पीनरई विजयन यांच्या सरकारकडून या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली गेली.
परिणामी केरळमध्ये तब्बल १७९ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अवघी १९४ इतकी असल्याचं कळत आहे. केरळने कोरोनाला आतापर्यंत दिलेली झुंज पाहता साऱ्या देशापुढे या राज्याने आदर्श प्रस्थापित केला आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट असतानाही केरळमध्ये रुग्णांची संख्या ही एकअंकी वाढताना दिसली. सध्याच्या घडीला भारतात एकंदर चित्र पाहता दर १०० रुग्णांमागे ९ रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. पण, केरळचा विचार केल्याच येथील रुग्णसंख्येच्या तुलनेत तब्बल ४८ टक्के रुग्ण आतापर्यंत घरी परतले आहेत ही प्रशंसनीय आणि तितकीच सकारात्मक बाब आहे.
केरळच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित रुग्ण हे तीन आठवड्यांच्या कालावधीत बरे होत आहेत. वुहानमधून परतलेल्यांना मात्र यातून सावरण्यासाठी महिनाभराचा काळ लागला होता हेसुद्धा खरं. थोडक्यात, स्वयंशिस्त, प्रशासनाला नागरिकांचं मिळालेलं सहकार्य या बळावर आज केरळ देशभरात कोरोनाशी आपली झुंज एका यशस्वी मार्गाने नेताना दिसत आहे. महाराष्ट्रातही जनतेने पूर्ण सहकार्य केल्यास कोरोनावर मात करणं सहज शक्य होणार आहे.
News English Summary: Following the restrictive measures, precautions and instructions in the battle against Corona, the state of Kerala has now managed to control the outbreak to some extent. Only 2 new Corona patients were found in Kerala yesterday. So, 36 patients were discharged from the hospital after being coronary. In India, the first Corona patient was found to be in Kerala. After that, important steps were taken by Chief Minister Pinarayi Vijayan’s government to fight the virus. As a result, 179 coronary patients in Kerala recovered and returned home. So, the number of corona-positive patients is now reported to be 194. This state has set a precedent for all the country in view of the struggles that Kerala has given to Corona so far.
News English Title: Story as new cases increasingly in the India but Kerala state managed to fight back the national trend of Corona virus Covid 19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL