4 May 2025 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोनामुळे धडा....चीनमध्ये श्वानांच्या मांस विक्रीवर अखेर बंदी

Corona Crisis, Corona outbreak, Covid19, China Banned Dogs Meat

बीजिंग, १० एप्रिल: करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र असलेले वुहान आता पूर्वपदावर आले आहे. तिथे व्यापार, वाहतूक सुरु झाली आहे. वुहानमध्ये लॉकडाउन संपला असला तरी तिथल्या नागरिकांमध्ये अस्वस्थतता कायम आहे. वुहानमधल्या छोटया दुकानदारांनी शहरातील एका मोठया मॉलबाहेर भाडे कमी करावे, यासाठी निदर्शने देखील सुरु झाली आहेत.

त्यानंतर नवे रुग्ण आढळल्यामुळे चीनवर पुन्हा कोरोनाचे संकट ओढावले आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, चीनमध्ये बुधवारी दोन महिन्यापेक्षा जास्त काळानंतर लॉकडाऊन हटविण्यात आले. मात्र, नव्या कोरोना रुग्णांमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनामुळे एकूण ३३३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा ८१८६५ इतका आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचे केंद्र ठरलेल्या चीनमध्ये श्वानाच्या मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रकोपादरम्यान चीनने श्वानाला पाळीव प्राण्याच्या श्रेणीत टाकले आहे. त्यामुळे त्याचे मांस खाण्याची परंपरा बंद करण्यात आली आहे. चीनमध्ये प्रत्येक वर्षी सुमारे एक कोटी श्वान मारुन त्याचे मांस भोजनात वापरले जाते.

कोरोना विषाणूबाबत सुरु असलेल्या चर्चांदरम्यान चीनच्या कृषी मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. फक्त अधिकृत कारणांसाठीच श्वानाला पाळण्याची परवानगी मिळेल किंवा त्याचा व्यापार केला जाईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, चीनच्या वुहान प्रांतात पशुंच्या मांसाची खुल्या बाजारात विक्री होते. या बाजारातूनच कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचे बोलले जाते.

 

News English Summary: The sale of cannabis meat has been banned in China, which is the epicenter of the Corona virus. During the outbreak of the Corona virus, China has placed Shwana as a pet. Therefore, the tradition of eating his meat has been discontinued. In China, about one crore dogs are used every year to feed their meat.

News English Title: Story Corona Crisis China banned dogs meat consumption by humans amid Covid19 outbreak News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या