लॉकडाउन पण जवाबदारीचं काय? रामायणाच्या वनवासाआड गरिबांचा वनवास दिसेनासा?

नवी दिल्ली, २८ मार्च: कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, म्हणजे आज २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती.
रामायण मालिकेचा पहिला भाग आज सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता दाखविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेला तेव्हा संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी दर रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित व्हायची.
तत्पूर्वी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने जगाला संदेश देताना म्हटलं आहे की केवळ लॉकडाउन करून चालणार नाही तर प्रत्येक देशातील सरकारला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उपाययोजना देखील कराव्या लागतील. मात्र काही दिवसांपासून केंद्र सरकार ‘ने संपूर्ण जवाबदारी सचिवांवर टाकून स्वतः डिजिटल जगातून संपर्कात आहेत तर काहीजण घरी बसून रामायणातील वनवासाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र लॉकडाउन’मुळे पायाची पायपीट करून वनवासाप्रमाणे क्षण अनुभवत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात चालत जाणाऱ्या गरीब कामगारांचा वनवास त्यांना दिसेनासा झाला आहे.
२१ दिवसांचा लॉकडाउन; काम नसल्याने उपाशी मारण्यापेक्षा मजूर गावाकडे पायी चालत.#CoronaCrisis pic.twitter.com/2T74Q5mOpG
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 27, 2020
#VIDEO – उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवरील चित्र. दूरदूरहून कामगार असे पायी चालत गाव गाठत आहेत.#CoronaCrisis pic.twitter.com/x3PmpeWQLS
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 28, 2020
News English Summary: Lock down has been implemented nationwide to prevent corona virus infections. Now, the central government has taken an important decision to entertain the citizens sitting at home. This coming Saturday, that is, today, March 28, a huge re-launch of the Ramayana series on the national television channel has begun. Union Minister Prakash Javadekar tweeted and informed about this. He said that the first part of the Ramayana series will be shown at 9am today and the second one at 9pm. In the 90s, the Ramayana was a hit on television. The series, directed by Ramanand Sagar, had a huge response throughout the country. At that time, the series was broadcast every Sunday morning.
News English Title: Story Corona virus lock down telecast of Ramayana will be starting again on dd National from today 28 March at 9 AM News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN