17 March 2025 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, एचएसबीसी ब्रोकरेजकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

VIDEO- 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा देणारी अमूल्या न्यायालयीन कोठडीत

Pakistan Zindabad Sloganeer Amulya

बंगळुरू : नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या तरुणीचं नाव अमूल्या असं आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर अमूल्यानं या घोषणा दिल्या.

CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका तरुणीने थेट व्यासपीठावरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तरुणीचे नाव अमूल्या असे सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘भारत जिंदाबाद था और रहेगा’, आम्ही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचे समर्थन करत नाही.

ओवेसी काय म्हणाले ?-
हा सगळा प्रकार ओवेसी यांच्यासमोरच घडला. त्यानंतर ओवेसी यांनी या घटनेवर खुलासाही केला. “तरुणीनं दिलेल्या घोषणांचा मी निषेध करतो. ज्या तरुणीनं घोषणा दिल्या, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारतच जिंदाबाद होता आणि जिंदाबाद राहिल,” ओवेसी यांनी या प्रकारावर म्हटलं आहे.

 

Web Title: Story Pakistan Zindabad Sloganeer Amulya sent to 14 judicial custody after controversial comment.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x