1 May 2025 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही | संथ गतीच्या लसीकरणावरून मोदींना इशारा

India corona pandemic

जयपूर, २७ मे | भारतात कोरोनाचे २.७१ कोटींहून जास्त रुग्ण समोर आले आहेत. ३ लाखांहून जास्त मृत्यू झाले. संसर्गाला रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. मेडिकल जर्नल लॅन्सेटने संसर्ग अतिशय भयंकर स्थितीत जाण्यापूर्वी रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला महत्त्वाचे ८ सल्ले दिले आहेत. लस खरेदी व वाटपाची जबाबदारी राज्यांना देण्याऐवजी केंद्राने ती हाताळावी. सर्वांना मोफत लस, सामूहिक प्रयत्न व मेडिकल, पॅरामेडिकल तसेच योगाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनाशी संबंधित सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सर्व मनुष्यबळाचा उपयोग करून घेण्याची शिफारसही लॅन्सेटने केली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर असेल, अशी भीती गेहलोत यांनी व्यक्त केलीय. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात कोरनाचा संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भातील भाष्य केलं आहे. “१३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशामध्ये तातडीने सर्वांच्या लसीकरणाची सोय केली नाही आणि करोना तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्ग झाला तर ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे दुसऱ्या लाटेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यापेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तिसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं तर आपण लहान मुलांना वाचवू शकणार नाही,” असं गेहलोत यांनी ट्विट केलं आहे.

पूढे त्यांनी ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांना टॅग केलं आहे. “मोदीजी आणि हर्ष वर्धनजी लसींच्या उत्पदनाला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचे होतं. यासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करुन इतर कंपन्यांनाही लसींच्या निर्मितीसंदर्भातील परवानगी देऊन प्रोत्साहन द्यायला हवं होतं. भारत हा जगभरामध्ये लस निर्मितीसाठी आघाडीचा देश मानला जातो,” असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सोडून राज्यांना जास्त प्रमाणात लसी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा अशी मागणी गेहलोत यांनी केलीय. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही, असं गेहलोत म्हणालेत.

 

News English Summary: In his third tweet, Gehlot demanded that the Union Health Ministry release the figures and focus on making more vaccines available to the states. The country will never forgive children infected in the third wave, Gehlot said.

News English Title: Third wave of corona may impact on children’s said CM Ashok Gehalot over slow vaccination news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या