26 January 2022 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund Investment | या म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवा | गुंतवणुकीवर तगडा परतावा मिळेल | यादी पहा Zomato Share Price | दुप्पट कमाईसाठी स्वस्त झालेला झोमॅटो शेअर खरेदी करा | तज्ज्ञांचा सल्ला पहा Multibagger Penny Stock | 8 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल | 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न | सध्या मिळतोय स्वस्त Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला
x

देशात मागील 24 तासात 3 लाख 62 हजार 389 नवे रुग्ण | तर 4,127 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, १३ मे | देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत. यातील, 1.97 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण रिकव्हर होत आहेत.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात आढळलेले नवीन संक्रमित: 3.62 लाख
  • मागील 24 तासात झालेले मृत्यू: 4,127
  • मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.51 लाख
  • आतापर्यंत संक्रमित झाले: 2.37 कोटी
  • आतापर्यंतठीक झाले: 1.97 कोटी
  • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू: 2.57 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 37.22 लाख

दरम्यान, देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. येत्या 20 मे रोजी व्हिडीओ कॉन्सफन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी संवाद साधतील. यावेळी ते महाराष्ट्रासह 10 राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील.

 

News English Summary: The number of corona patients in the country has increased again in the last 24 hours. On Wednesday, 3 lakh 62 thousand 389 new patients were found, while 3 lakh 51 thousand 740 patients overcame the corona. Meanwhile, 4,127 patients died on Wednesday. This is the second day in a row that more than 4,000 patients have died.

News English Title: Total 3 lakh 62 thousand 389 new patients are found in India today news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x