3 May 2025 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंविरोधात पुन्हा ट्विटरवर जोरदार अभियान | हजारो ट्विट्स

Twitter trending, Minister Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput Case, MumbaiWalaPappu

मुंबई, ९ ऑगस्ट : सुशांत प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याची योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा रोख महाविकास आघाडीवर असला तरी त्यांचं मुख्य लक्ष हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हेच असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर आदित्य ठाकरेंविरोधात डिजिटल अभियान जोरदारपणे सुरु झाले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील काही अभियानं ही ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगवर होती हे देखील पाहायला मिळालं. त्यात मागील काही दिवसांपासून देशभरातील भाजप समर्थक समाज माध्यमांवर आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करत आहेत. अगदी राज्यातील भाजप नेत्यांचं आदित्य ठाकरे हेच एकमेव लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काही ठराविक माध्यमं देखील आदित्य ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून मोठं मोठ्या चर्चा घडवून आणत असल्याने विषय अजूनच पेट घेतोय. आजच्या घडीला भाजपच्या आयटी सेलसमोर देशातील सर्वच पक्ष जवळपास फेल आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या आयटी सेलचा देखील टिकाव लागणार नाही हे देखील वास्तव आहे. त्यामुळे शिवसेनेतील नेते मंडळींना प्रसार माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नसल्याचं पाहायला मिळत आहे.

आज पुन्हा ट्विटरवर #MumbaiWalaPappu ट्रेंडिंगमध्ये आलं आहे, यापेक्षा ते आणलं गेलं आहे असंच म्हणावं लागेल. देशभर आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम सुरु असल्याचं ऑनलाईन मार्केटिंग तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेना नैतृत्व याकडे दुर्लक्ष करून मोठी चूक करत असल्याचं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कारण असंच तंत्र वापरून राहुल गांधी यांची प्रतिमा देशभर मलीन करण्यात आली होती आणि त्यानंतर पक्षाला त्याचे दूरगामी राजकीय परिणाम भोगावे लागले होते.

 

News English Summary: Today, #MumbaiWalaPappu is trending on Twitter again, it has to be said that it has been brought. Online marketing experts have said that a disciplined program is underway to tarnish the image of minister Aaditya Thackeray across the country.

News English Title: Twitter trending against Minister Aaditya Thackeray over Sushant Singh Rajput Case News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या