4 May 2025 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

आपल्याकडील केंद्रीय मंत्रालयाचा राज्याला काय फायदा होतोय हे न सांगता, राणेंनी शिवसैनिक अन गद्दारातील फरक सांगितला

Narayan Rane

Union Minister Narayan Rane | लघुउद्योग भारती संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जातं आहे. या अधिवेशनात उद्योजक आपल्याला येणाऱ्या समस्या आणि आव्हानं यांचीही चर्चा करतात. कोरोनामुळे दोन वर्षे हे अधिवेशन होऊ शकलंल नव्हतं.

2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणुक लढली असताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुनच खरी गद्दारी केल्याचा थेट आरोप केला आहे. तर एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत. त्यांनी पडत्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिल्यानेच शिवसेना उभी राहिल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीबरोबर जाऊनच उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली. त्यावेळी त्यांनी सर्व शिवसैनिकांना विचारात घेऊन निर्णय घेतला नाहीतर स्वार्थासमोर त्यांना सर्वच बाबींचा विसर पडल्याचे राणे म्हणाले आहेत. त्यामुळे खरे गद्दार कोण हे आता जनतेचे समोर आल्याचेही राणे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी गप्प बसावं :
आदित्य ठाकरेंनी जरा गप्प बसावं आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही जर बोललो तर मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी बाहेर काढू. आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना काय दिलंय? असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो? आदित्य ठाकरे विरोधी पक्षात आहेत त्यामुळे रस्त्यावर यायला हवं. आदित्य ठाकरेंबाबत मला प्रश्न विचारू नका तो वेड्यासारखं बडबडतोय असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

आम्ही आमची मुंबई म्हणतो. पण आर्थिक उलाढालीत आपण मराठी एक टक्का नाही. आपल्या देशात मारवाडी 1 टक्का आहे आणि उलाढाल किती 23 टक्के आहे. आपण म्हणतो मुंबई आमची पण आर्थिक उलाढालीत आपण फक्त एक टक्का आहे. जो राजकारणी स्वतः काही करत नाही तो दुसऱ्याच्या खिशात हात घालतो, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. मी आधी उद्योजक मग राजकारणी आहे, असेही यावेळी राणेंनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union Minister Narayan Rane political attack on Uddhav Thackeray check details 16 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या