19 April 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

हिंसेनं समस्या सुटू शकत नाही | राहुल गांधींचं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन

Violence, Rahul Gandhi, Farmers Tractor Rally

नवी दिल्ली, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र त्यापूर्वीच मोठा हिसाचार झाल्याचं पाहायला मिळालं.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलं की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.”

 

News English Summary: Against this backdrop, Congress leader Rahul Gandhi has appealed to the farmers for peace. Rahul Gandhi tweeted, “Violence is not the answer to any problem. No matter who is injured, our country will suffer. Laws against agriculture should be withdrawn in the interest of the country.

News English Title: Violence is not the answer to any problem said Rahul Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x