3 May 2025 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शेतकरी आंदोलनात राजकीय पक्षाचे लोक घुसले | त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप

Violence premeditated, Farmer tractor rally, Rakesh Tikait

नवी दिल्ली, २६ जानेवारी: नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

वास्तविक सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, रॅलीचा मार्गसोडून काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला, तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. पण यावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे. “पोलीस आम्हाला संपूर्ण सहकार्य करत होते आणि आहेत. पण काही आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि ते निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट केला गेला होता”, असा आरोप टिकैत यांनी केला आहे.

 

News English Summary: Some protesters stormed the Red Fort on the way to the rally, while violence erupted in some places. But this is now the beginning of the allegations. Rakesh Tikait, a spokesman for the Indian Farmers ‘Union, said some political parties had joined the farmers’ agitation and accused them of inciting violence. “The police were and are cooperating with us as a whole. But there is confusion among some protesters and there was a premeditated plot to create it,” Tikait alleged.

News English Title: Violence premeditated conspiracy involving people political parties allegation farmer leader Rakesh Tikait news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या