14 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

गाव असो वा शहर, सर्वत्र भाजपच्या पराभवाची मालिका, प बंगाल पंचायत निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला, TMC 14,767 जागांवर विजयी

West Bengal Panchayat Election Result 2023

W Bengal Panchayat Election | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 14,767 तर भारतीय जनता पक्षाने 2,733 जागांवर विजय मिळवला आहे. शेवटच्या क्षणी भाजपच्या जागा अजून घटतील असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. राज्यभरातील एकूण ३४१ पंचायत समित्यांपैकी २८ जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, तर अन्य समित्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

भारतीय जनता पक्षाकडून पश्चिम बंगालमध्ये सर्व रसद पुरविण्यात आली होती, मात्र ममता बॅनर्जींनी मोदी-शहा यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान २० जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे ६९७ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते.

पंचायत निवडणूक निकाल अपडेट

टीएमसीने १४ हजारग्रामपंचायतीच्या जागा जिंकल्या; भाजप दुसऱ्या स्थानावर
* टीएमसी – 14,767
* भाजप – ३,३४४
* माकपा – 1,086
* काँग्रेस – 783
* निर्दलीय – 854

पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार, बेहर आणि जलपाईगुडी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचा दबदबा आहे. पक्षाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर, विशेषत: भारतीय जनता पक्षावर लक्षणीय आघाडी मिळविण्यात यश मिळवले आहे. ताज्या वृत्तानुसार, अलीपूरद्वारमध्ये तृणमूल काँग्रेसने 170 ग्रामपंचायतींच्या जागा काबीज केल्या आहेत, तर भाजप केवळ 42 जागांसह खूप मागे पडला आहे. त्याचप्रमाणे बेहरमध्ये टीएमसीने पुन्हा एकदा विजय मिळवत एकूण २३४ ग्रामपंचायतींपैकी १८७ जागा जिंकल्या आहेत. जलपाईगुडीमध्येही टीएमसीने विजय मिळवला असून, एकूण ९९ पैकी ७४ जागा ंवर बहुमत मिळवले आहे. भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले.

News Title : West Bengal Panchayat Election Result 2023 on 11 July 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x