15 August 2022 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

भाजपा फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो | प. बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून गावभर फिरून जनतेची माफी

CM Mamata Banerjee

कोलकाता , १३ जून | भारतीय जनता पक्षाचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाचे तारे फिरल्याचे पाहायला मिळतंय. त्यात भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणारे मोठे नेते आणि सामान्य कार्यकर्ते सुद्धा स्वगृही परतू लागले आहेत. मात्र तत्पूर्वी देखील ते भाजपाला दोष देत स्वतःच्या चुका मान्य करून गावागावात माफी मागत फिरत आहेत.

काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत. बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. परंतु, भारतीय जनता पक्षाचा असा आरोप आहे की या सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे.

या माफिनाम्यामध्ये सांगण्यात आलं की भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भारतीय जनता पक्षाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भारतीय जनता पक्षाचे ३०० कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले.

 

News Title: West Bengal BJP party Workers on streets for public apology and said they want to join TMC party news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x