27 September 2020 4:55 PM
अँप डाउनलोड

पँगाँग फिंगर ८ पर्यंत भारताची हद्द | मात्र चिनी सैन्य फिंगर ८ पासून फिंगर ४ पर्यंत घुसल्याच वृत्त

India China FaceOff, Finger Three in Pangong, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर : मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तासाची चर्चा झाल्यानंतरही दोन्ही देशात तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशातील सैनिक लडाखमध्ये शस्त्र आणि दारूगोळा घेऊन ३०० मीटर दूर आमने-सामने उभे आहे. याच दरम्यान जपान आणि ताइवान या दोन देशांनी चीनला आपल्या देशातील सीमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेतावणी जाहीर केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे प्रसार माध्यमांना माहितीनुसार ज्यावेळी रशियामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी चीनने पँगाँग सरोवराच्या परिसरात आगळीक केली. सूत्रांनी सांगितले की, सध्या पँगाँग सरोवरातील फिंगर ४ वर भारतीय लष्कर तैनात झाले आहे. फिंगर ४ पासून फिंगर ८ पर्यंतचे अंतर हे आठ किलोमीटर एवढे आहे. या फिंगर ८ पर्यंत भारताची हद्द आहे. मात्र सध्या चीनचे सैन्य फिंगर ८ पासून फिंगर ४ पर्यंत घुसले आहे. तसेच फिंगर २ पर्यंत आपला हद्द असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे ताइवानचे उपराष्ट्रपती Lai Ching-te यांनी सांगितलं की, चीनने लाइनला क्रॉस करू नये आणि आपल्या फायटर विमानांना ताइवानची हवाई सीमेचं उल्लंघन करण्यापासून रोखण्याची चेतावणी दिली आहे. चेतावणी दिली आहे की, ताइवान आपल्या हवाई सीमेच्या रक्षणाकरता एअर डिफेंस आयडेंटिफिकेशन झोन बनवत आहे. याकरता चीनने आता कोणतीच चूक करू नये. उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं आहे की, ताइवानला शांती आहे. मात्र आपल्या लोकांच्या संरक्षणाकरता त्यांना लढणं माहित आहे.

 

News English Summary: Tensions remain high between the Indian and Chinese foreign ministers in Moscow after nearly two and a half hours of talks. Soldiers from both the countries are facing each other in Ladakh 300 meters away with arms and ammunition.

News English Title: India China FaceOff China broke the word again opened a front in the direction of Finger Three in Pangong Marathi News LIVE latest updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndiaChina(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x