 
						Sarkari Scheme | एलआयसी ग्राहकांसाठी खुश खबर आली आहे. एलआयसी जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता. ही एक योजना तुमच्या पूर्ण कुटुंबाचे भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित करू शकते. ही जीवन विमा पॉलिसी तुम्हाला सुरक्षित नफा कमावून देऊ शकते. एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी “जीवन उमंग पॉलिसी” ही एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून अप्रतिम परतावा कमवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या अद्भुत जीवन विमा पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती.
LIC जीवन उमंग पॉलिसी :
एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी ही इतर योजनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी मानली जाते. या योजनेत 90 दिवसांपासून ते 55 वर्षे या वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. जीवन उमंग पॉलिसी ही एक एंडोमेंट योजना असून यामध्ये लाइफ कव्हरसह मॅच्युरिटीवर एकरकमी परतावा रक्कम परत दिली जाते. या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यात वार्षिक निश्चित उत्पन्न रक्कम जमा केली जाईल. दुसरीकडे, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना/वारसदारांना किंवा नॉमिनीला एकरकमी परतावा रक्कम दिली जाईल. जीवन उमंग पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना तुम्हाला 100 वर्ष कालावधीचे कव्हरेज देते.
मॅच्युरिटीवर मिळेल मोठा परतावा :
* जिवन उमंग पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा 1302 रुपये प्रीमियम जमा केल्यास एका वर्षात तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 15,298 रुपये होईल.
* जर तुम्ही जीवन उमंग पॉलिसीमध्ये 30 वर्षांसाठी गुंतवणूक करत राहिलात तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 4.58 लाख रुपये होईल.
* तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर LIC कंपनी तुम्हाला 31 व्या वर्षापासून दरवर्षी 40 हजारांचा व्याज परतावा तुमच्या बँक खात्यात जमा करेल.
* ही योजना तुम्हाला योजनेच्या 31 व्या वर्षे पासून ते 100 वर्षांपर्यंत वार्षिक 40 हजार व्याज परतावा देत राहील. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 27.60 लाख रुपये परतावा मिळेल.
टर्म रायडरलाही मिळणारा फायदा :
* LIC जीवन उमंग पोलिसी मधे पैसे लावणाऱ्या गुंतवणुकदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला टर्म रायडर बेनिफिट लाभ दिला जाईल.
* शेअर बाजारातील जोखमीचा या योजनेतील गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
* या पॉलिसीचा परिणाम एलआयसीच्या नफा-तोट्यावर होतो.
* ही पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत लाभ मिळेल.
* जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		