1 May 2025 9:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

चीनी नागरिकांनी बॅन करावं असं भारतीयांकडे काय आहे?, चीनने डिवचल्याने आनंद महिन्द्राचं ऊत्तर

Chinese editor, Global Times, Anand Mahindra

बीजिंग, १ जुलै : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मोदी सरकारनं चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालल्यानंतर चीननेसुद्धा भारतीय वृत्तवाहिन्या आणि माध्यमसमूहांशी संबंधित सर्व वेबसाइट बॅन केल्या आहेत. चीनमध्ये भारतीय संकेतस्थळ किंवा थेट भारतीय टीव्ही पाहण्याची सुविधा आता फक्त आभासी खासगी नेटवर्क (व्हीपीएन) द्वारे मिळू शकते, पण गेल्या दोन दिवसांपासून व्हीपीएनची सुविधाही चीनमध्ये खंडित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या आदेशावरून भारतीय वृत्त वेबसाइटवर बंदी घालण्यात आली आहे.

मात्र चीनने पुन्हा भारतास डिवचण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. भारताने बॅन केलेल्या ५९ अप्सपैकी ट्विटरसारखे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं Vigo अॅपही आहे. ज्या अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हेरीफाईड अकाऊंट असून त्यावर २ लाख ४० हजार फॉलोवर्स आहेत, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. तसेच, चीनच्या ग्लोबर टाइम्सचे संपादक हू शिजिन ट्विट करुन भारतीयांना चॅलेंजच केलंय. चीनच्या लोकांनी भारतीय उत्पादनास बॅन करायचा निर्णय घेतला, तर त्यांना पर्यायही नाही. कारण, भारतीयांकडे तसे काही नाही की, जे चीनी नागरिकांनी बॅन करावे, असे म्हणत संपादक महाशयांनी निशाणा साधला होता. त्यास, उद्योगपती आनंद महिंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

‘आपण भारतीयांना उद्देशून केलेली टीका ही पहिल्यांदाच आहे, त्यामुळे सर्वात प्रेरक आणि प्रभावी सिद्ध होईल. आम्हाला डिवचल्याबद्दल धन्यवाद, आम्ही या संधीचं सोनं करुन दाखवू’, असे प्रत्युत्तर महिंद्रा यांनी दिलंय.

 

News English Summary: Hu Shijin, editor of China’s Global Times, challenged Indians by tweeting. If the Chinese decide to ban Indian products, they have no choice. Because, Indians don’t have anything that should be banned by Chinese citizens, said the editor-in-chief.

News English Title: Chinese editor told Indians Anand Mahindra said well about ban 59 apps News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या