फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडात एका बँकेत करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेत झालेल्या गोळीबारात तब्बल ५ निरपराधांचा मृत्यू झाला आहे.
तशी अधिकृत माहिती सीब्रिंगचे पोलीस प्रमुख कार्ल होग्लंड यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. झीफेन एव्हर असे संशयित हल्लेखोराचे नाव असून सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक केली आहे. मात्र अद्यापही गोळीबार करण्यामागचे त्याचं मूळ कारण काय होतं ते स्पष्ट झालेने नाही. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केवळ सामान्य ग्राहक होते की बँकेचे कर्मचारी सुद्धा ते अजून पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट झालेले नाही.
