पॅरिस : पॅरीसमधील सर्वात प्राचीन आणि नेपोलिअन बोनापार्टचा राज्याभिषेक झालेल्या ८५० वर्षांच्या ऐतिहासिक नॉट्र डॅम कॅथेड्रल चर्चला भीषण आग लागली आहे. बाराव्या शतकातील ऐतिहासिक चर्च सोमवारी आगीच्या भक्षस्थानी पडले असून या चर्चच्या छताचा भाग जळून खाक झाला आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे स्थानिक अग्निशामक दलाने सांगितले आहे.

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारे ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’ चर्चला लागलेल्या आगीत प्रार्थनास्थळाचा हॉल आणि आकर्षक असा उंच मनोरा भस्मसात झाला आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश आले आहे. नोट्रे-डेम-कॅथेड्रल या चर्चच्या बांधकामाला ११६० मध्ये सुरुवात झाली होती हे काम १२६० पर्यंत चालले. जीर्ण झालेल्या या चर्चमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते, यामुळेच आग लागलेली असू शकते अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पॅरिस: ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’ चर्चला भीषण आग