7 August 2020 8:43 AM
अँप डाउनलोड

हार्दिकची तुफान फटकेबाजी; मुंबई इंडियन ‘विजयी’

IPL 2019, Hardik Pandya, Mumbai Indian

मुंबई : आयपीएल २०१९ मध्ये हार्दिक पांड्याने फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाच गडी राखून पराभूत केले आहे. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. तर बंगळुरुचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढे या सामन्यात पाहायला मिळाले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सलामी दिली. पहिल्या ६ षटकांमध्ये मुंबई दहाच्या सरासरीने धावा केल्या. मात्र त्यानंतर मुंबईला रोहित शर्मा आणि क्विंटन डी’कॉकच्या रुपात दोन धक्के बसले. रोहितने २८ तर डी’कॉकने ४० धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने ९ चेंडूंत २१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव संघाचा डाव सावरला. परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्यादेखील 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या धमाकेदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x