1 May 2025 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

G7 परिषद | मोदींकडून 'वन अर्थ वन हेल्थ'चा मंत्र | विरोधक म्हणाले 'धिस इज अर्थ - धिस इज अनर्थ'

One Earth One Health

नवी दिल्ली , १३ जून | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले. यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘वन अर्थ वन हेल्थ’ चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.

12 आणि 13 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन भाषणं या समिटमध्ये होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे G7 समिटमध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाले आहेत. याआधी 2019 साली फ्रांसमध्ये झालेल्या समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. भारत हा निमंत्रित देश असून पंतप्रधान मोदी हे ब्रिटनला जाणार होते पण नंतर देशातील करोना परिस्थिती बिघडल्याने त्यांनी दौरा रद्द केला.

जी ७’ देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, जपान यांचा समावेश असून भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे निमंत्रित किंवा पाहुणे देश आहेत. भारताला या शिखर बैठकीपासून करोना लशींच्या पुरवठ्याबाबत तर अपेक्षा आहे. भारतात लशीची कमतरता आहे त्यामुळे अमेरिकेकडून त्या मदतीचीही अपेक्षा आहे.

दुसरीकडे ‘वन अर्थ वन हेल्थ’ चा मंत्र दिला त्यावरून भारतात खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. तृणमूलचे नेते गुलाम रब्बानी यांनी एक ट्विट करत मोदींच्या मंत्राची खिल्ली उडवत एक खोचक चित्रं देखील शेअर करत त्यामध्ये ‘धिस इज अर्थ आणि धिस इज अनर्थ’ असं लिहिलं आहे. समाज माध्यमांवर देखील या ट्विटला प्रतिसाद मिळत आहे.

 

News Title: PM Modi speech G7 address virtual summit session One Earth One Health motto news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या