3 November 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

चीनसोबतच्या मैत्रीवरून नेपाळमधील सत्ताधारी नेपाल कम्युनिस्ट पार्टीमध्ये फूट

काठमांडू, २० जून : भारत आणि नेपाळ यांच्यातील वादग्रस्त नकाशानंतर त्याचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दोन देशांमधील संबंधांवर होऊ लागला आहे. दुसरीकडे भारताशी वैर घेऊन चीनशी मैत्री वाढविण्याच्या मुद्द्यावरून नेपाळमधील सत्ताधारी नेपाल कम्युनिस्ट पार्टी मध्ये उभी फूट पडली आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर चीनने चीनच्या व नेपाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली होती. शुक्रवारी झालेल्या या बैठकीमध्ये नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले. भारताशी वैर पत्करून चीनशी मैत्री करणे सध्याच्या युद्ध सदृश्य परिस्थिती योग्य नाही, असे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या काही बड्या नेत्यांचे म्हणणे आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाल आणि झलनाथ खनाल यांनी या या दोन्ही देशांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या बैठकीत भाग घेतला नाही. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे तेवढेच नेते उपस्थित होते. यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू होती. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे आंतरराष्ट्रीय बाबींचे प्रमुख विष्णू रिजल यांनी या बैठकीबाबत नाराजी दर्शविली. आम्हाला या बैठकीबाबत कुठचीही पूर्वसूचना नव्हती. एवढ्या घाईघाईने ही व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याची काय गरज होती? हेच आम्हाला कळत नाही, असे विष्णू यांनी सांगितले.

तर दुसर्‍या एका कम्युनिस्ट नेत्यांनी सांगितले की, “ज्यावेळी भारतासोबतचे आमचे संबंध प्रचंड प्रमाणात बिघडलेले असताना अशा परिस्थितीत चीनच्या कंबरेवर जाऊन बसणे ठीक नाही. हे आमच्या पक्षाचे धोरण नाही. ज्या वेळी भारताची आपले संबंध बिघडलेले असताना आणि चीन व भारत यांच्या युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना अशा चीन सोबतच्या कॉन्फरन्सची काहीही गरज नव्हती.”

दुसऱ्या बाजूला नेपाळमध्ये भारतीय महिलांना राजकीय आणि सामाजिक हक्कांपासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा एक भाग म्हणून नेपाळ सरकार निर्णय घेत आहे जो दोन्ही देशांमधील मैत्री कराराविरूद्धही आहे. नेपाळ सरकारने यापूर्वीच भारताशी राजकीय आणि मुत्सद्दी संबंधांमध्ये दरी निर्माण केली आहे.

आता दोन्ही देशांमधील वैवाहिक संबंध आणि कौटुंबिक संबंध संपविण्याच्या धोरणाच्या भाग म्हणून आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या नागरिकाशी लग्न करून नेपाळला गेलेल्या भारतीय महिलांना आता नेपाळचे नागरिकत्व मिळविण्यासाठी ७ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत नेपाळमधील भारतीय विवाहित महिलांना सर्व प्रकारच्या राजकीय हक्कांपासून वंचित राहावे लागेल.

 

News English Summary: Following the controversial map between India and Nepal, it is now beginning to affect relations between the two countries that have been going on for hundreds of years. On the other hand, the ruling Communist Party of Nepal (CPN-M) in Nepal is divided over the issue of enhancing friendship with China by hating India. After the attack on India, China held a meeting of communist leaders of China and Nepal through video conferencing.

News English Title: Ruling Communist Party of Nepal CPN M in Nepal is divided over the issue of enhancing friendship with China by hating India News latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x