कथित स्वतंत्र हिंदू राष्ट्र स्थापल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ कैलासची स्थापना | स्वामी नित्यानंद

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट : बलात्काराच्या आरोपा नंतर देश सोडून गेलेला ‘स्वयंभू महाराज’ नित्यानंदने एका स्वतंत्र हिंदू देशाचा स्थापना केल्याचा कथित दावा केला होता. नित्यानंद जेव्हा देशापासून पळाला तेव्हापासून त्याचा शोध भारतातील पोलीस यंत्रणा घेत आहे. परंतु आता त्यांने एक कथित देश बनविला आहे असं समोर आलं होतं. जगातील कोणत्या कोपऱ्यात नेमका लपला आहे हे अद्याप माहित नसलं तरी नित्यानंद यांनी संबंधित देशाचे नाव ‘कैलासा’ ठेवले आहे.
२२ नोव्हेंबर रोजी गुजरात पोलिसांनी नित्यानंदच्या अहमदाबाद आश्रमात शोध मोहीम केली होती. मात्र तेथे काही विशेष वस्तू सापडल्या नव्हत्या. नित्यानंदने बनवलेल्या कैलासा देशाची “कैलासा.ऑर्ग” नावाने वेबसाइट देखील सुरु केली होती. संबंधित वेबसाइटवर असे लिहिले होते की, ‘कैलाशा हा एक देश आहे, जेथे हिंदूंसाठी कोणत्याही सीमा नाहीत. हा देश त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी आपल्या देशात हिंदू होण्याचा हक्क गमावला आहे. ‘ इतकेच नाही तर अमेरिकेत कैलासा देशाची संकल्पना झाल्याचे वेबसाइटवर सांगण्यात आलं होतं. सनातन हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी याची रचना केली गेली आहे. नित्यानंद यांचं या देशात स्वतःच सरकार आहे, ज्यात गृह विभाग असो की वित्त विभाग असो, अशी सर्वकाही तरतूद आहे असं म्हटलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अनेकदा याच नित्यानंद महाराजांच्या आश्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून गेले आहेत.
मात्र आता ‘कैलास’ नावाचं स्वतंत्र हिंदूराष्ट्र स्थापन केल्याचा दावा करणाऱ्या नित्यानंदने या कथित राष्ट्राच्या शिखर बँकेची स्थापनाही केली आहे. या बँकेचं त्यानं ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ असं नामकरणही केलं आहे. तसेच या गणेश चतुर्थीला तो या बँकेचं चलनही घोषित करणार आहे. यासंदर्भात नित्यानंदचा स्वतः माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मिरर नाऊच्या वृत्तानुसार, स्वामी नित्यानंदवर लहान मुलांना डांबून ठेवण्यासह इतर बलात्काराचे आरोप आहेत. त्याने ५० न्यायालयीन सुनावण्याही चुकवल्या आहेत. भारतातून तो फरार झाला असून इंटरपोलनं त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बाजवली आहे. मात्र, अद्यापही तो मुक्तपणे वावरत असून भविष्यातील विविध योजना आखत आहे. बलात्कार प्रकरणाची अहमदाबादमधील नित्यानंदबाबतची सुनावणी करोनाच्या संकटामुळं थांबवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सुनावणी याच महिन्यांत कर्नाटकमध्ये होणार आहे.
नित्यानंद आपल्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगतो की, “३०० पानांची आर्थिक धोरणांसंबंधीची कागदपत्रे, चलन आणि त्याचा वापर याबाबत सर्वकाही तयार आहे. यासंदर्भात कैलास या देशासोबत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून आम्हाला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ही संस्था कायदेशीर असणार आहे.”
Self-styled godman & rape accused #Nithyananda, in a video, announces that he’s set up a bank called Reserve Bank of Kailasa & the currency will be announced on #GaneshChathurthi. Nithyananda roams free despite being accused of sexual assault & has missed over 50 hearings so far pic.twitter.com/J70G7acag6
— Mirror Now (@MirrorNow) August 17, 2020
News English Summary: Self-styled godman & rape accused Nithyananda, in a video, announced that he has set up a bank called Reserve Bank of Kailasa and the currency will be announced on Ganesh Chathurthi. Nithyananda roams free despite being accused of sexual assault and has missed over 50 hearings so far. Earlier Nithyananda who is suspected to have fled the country dodging the security agencies, we found out that he has formed a new country – Kailaasa.
News English Title: Self Styled Godman Nithyananda Sets Up Reserve Bank Of Kailasa News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER