28 June 2022 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा
x

जगासाठी आनंदाची बातमी; इंग्लंड आणि रशियाने कोरोनावर लस तयार केली

Corona Crisis, Russia Made Vaccine, United Kingdom Made Vaccine

लंडन, २८ मार्च : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.

त्यानंतर अमेरिकेतील अबॉट लॅबोरेटरिजने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी एक सोपी चाचणी उपलब्ध करून दिली आहे. या चाचणीच्या माध्यमातून अवघ्या पाच मिनिटांत या विषाणूची लागण झाली आहे की नाही समजते. त्याचबरोबर ही चाचणी करणारे उपकरणही हाताळण्यास एकदम सोप्पे आहे. ते कोणत्या रुग्णालयात, दवाखान्यामध्ये सहज ठेवता येऊ शकते. येत्या एक एप्रिलपासून रोज अशी ५० हजार उपकरणे उपलब्ध करून देण्याचे अबॉट लॅबोरेटरिजने म्हटले आहे.

त्यानंतर जगासाठी अजून एक आनंदाची बातमी रशिया आणि इंग्लंडमधून आली आहे. कारण इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. येथी १८ ते ५५ वर्ष वयातील लोकांवर हिचा प्रयोग करायलाही सुरुवात करण्यात आली आहे. या अनुशंगाने आता इंग्लंडच्या औषध प्राधिकरणाने ChAdOx nCoV-19 नावाचे औषध तयार करायला मंजुरीही दिली आहे.

तर दुसरीकडे रशियातील शास्त्रज्ञांनीही कोरोना विरोधातील लस तयार केली आहे. येथील व्हेक्टर स्टेट व्हायरॉलॉजी अँड बायोटेक सेंटरने ही लस तयार केली आहे. जनावरांवर हीचे प्रयोग केले जात आहेत. ही लसही लवकरच बाजारात येण्याची आशा आहे.

 

News English Summary: The United States, which has a global superpower, appears to be in the throes of the Corona virus that is plaguing the world. Coronary arthritis in the United States reaches over one million. So far, 1544 people have died due to corona. Then another good news for the world came from Russia and England. Because the University of Oxford in England has the vaccine for the corona virus. It has also been started to experiment with people aged 18 to 55 years. The drug has now been approved by the UK Drug Authority to manufacture a drug called ChAdOx nCoV-19. On the other hand, scientists in Russia have also developed a vaccine against Corona. The vaccine was prepared by the Vector State Virology and Biotech Center here. These experiments are being done on animals. The vaccine is also expected to come to the market soon.

 

News English Title: Story corona crisis Russia and United Kingdom developed corona virus vaccine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x