1 May 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

अमेरिका: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ

Covid19, Corona Crisis, US President Donald Trump

वॉशिंग्टन, १८ एप्रिल: चीनमधील वुहान शहरापासून सुरू झालेला करोनाचा संसर्ग आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. चीनमध्ये करोनाचा संसर्ग नियंत्रित झाला असला तरी जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत सहा लाख ७० हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ३३ हजारांपेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. जगात करोनामुळे सर्वाधिक जीवितहानी अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेतील सर्वच ५० राज्यात करोनाचा संसर्ग पसरला आहे.

Baltimore-based university च्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ३६७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७००२८२ जण करोनाबाधित आहेत. शुक्रवारी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतील न्यूयार्क शहरात झाले आहेत. आतापर्यत न्यूयार्कमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजारांच्या पुढे गेली आहे. एखाद्या देशांपेक्षा जास्त मृत्यू न्यूयार्कमध्ये झाले आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत तीन हजार ८५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या १,७२, ४३४ वर गेली आहे, तर तब्बल २२,७४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या २२,७४५ वर गेली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये ४६३२, स्पेनमध्ये २२,७४५, इराणमध्ये ४,९५८, फ्रान्समध्ये १८,६८१, जर्मनीमध्ये ४,३५२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: According to a Baltimore-based university, as of 8pm on Friday, 36773 people have died due to the Corona virus in the United States. So 700282 people are tax-free. The highest number of deaths occurred in New York City in the United States on Friday. So far in New York, the death toll has surpassed 14,000. New York has more deaths than any country. In the past 24 hours, 3,000 856 people have died in the United States.

News English Title: Story US Covid 19 death count reached on highest level in the world News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या