15 December 2024 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांकडून चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी विधेयक

Covid19, Corona Crisis, China Wuhan

वॉशिंग्टन डीसी, १४ एप्रिल: कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला चुकीची माहिती देण्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. या विषाणूचा फैलाव वुहान शहरातून सुरु झाला होता आणि यामुळे आतापर्यंत १,१९,६६६ जणांचा बळी गेला आहे. तर २० लाख लोकांना याची लागण झाली आहे.

चीन अजून दुष्परिणाम का भोगत नाही, असा सवाल व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने वारंवार ट्रम्प यांना विचारला होता. त्यावर ट्रम्प म्हणाले की, चीन दुष्परिणाम भोगत नाही, हे तुम्हाला कसं समजलं ? मी तुम्हाला काही सांगणार नाही. नाहीतर चीनला याची माहिती होईल, आणि मी तुम्हाला का सांगू?, असा प्रतिसवालही केला.

दरम्यान, सिनेटर स्टिव्ह डेन्स यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून आवाहन केले. ते म्हणाले की, अमेरिकन सरकार चीनवर वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांवर अवलंबून राहणे संपवले पाहिजे. अमेरिकेत औषधे बनवण्यासंबंधीच्या नोकऱ्या परत आणाव्यात. रिपब्लिकन पक्षाच्या चार खासदारांनीही चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सोमवारी एक विधेयक सादर केले होते.

पण दुसरीकडे चीनसारखा देश जगभरात पसरलेल्या आर्थिक मंदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी चीननं दक्षिण चीन महासागरात युद्ध सराव केला होता. त्यानंतर आता चीननं आपला मोर्चा कच्च्या तेलाकडे वळवला आहे. चीनच्या कच्च्या तेलाच्या आयातीत तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस एडनम यांनी सांगितले की, कोविड-१९ वेगाने फैलावत असून हा संसर्ग २००९ मध्ये आलेल्या स्वाइल फ्लूपेक्षा ही अधिक खतरनाक असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात करोनाच्या संसर्गाच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनसह इतर निर्बंधही टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

 

News English Summary: US President Donald Trump has warned China about the consequences of misinforming the World Health Organization (WHO) and the international community on the Corona virus. The outbreak began in the city of Wuhan and has killed 1,19,666 lives so far. So 2 million people are infected.

News English Title: Story US President Donald Trump hints at consequences for China on Corona virus Covid 19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x