8th Pay Commission l खुशखबर, सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18,000 रुपयांवरून 37,440 रुपयांपर्यंत वाढणार

8th Pay Commission l केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. या घोषणेनंतर सरकारी कर्मचारी नव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. आठव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढ केली जाऊ शकते.

सरकार 1 जानेवारी 2026 पासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीलागू करू शकते, असे यापूर्वी मानले जात होते. मात्र, आता एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा थोडी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू होणार
दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग स्थापन केला जातो. भारतात पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन करण्यात आला. आतापर्यंत 7 वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग स्थापन केला जातो. सातव्या वेतन आयोगाची मुदत 2026 मध्ये संपणार असल्याने आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया या वर्षी सुरू होईल, जेणेकरून पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी होऊ शकेल.

पगारात इतकी वाढ अपेक्षित
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीलागू झाल्यास सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन रचनेत मोठा बदल होऊ शकतो, असे संकेत सरकारने दिले आहेत. फिटमेंट फॅक्टर 2.08 निश्चित केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 37,440 रुपयांपर्यंत वाढू शकते. त्याचप्रमाणे पेन्शन 9,000 रुपयांवरून 18,720 रुपयांपर्यंत वाढू शकते. जर फिटमेंट फॅक्टर 2.86 वर गेला तर पगारात सुमारे 186% वाढ होऊ शकते आणि किमान वेतन 51,480 रुपये आणि पेन्शन 25,740 रुपये होण्याची शक्यता आहे.