 
						Aadhar ATM Facility | तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली आणि तुमच्याकडे एटीएममधून पैसे काढण्यास पुरेसा वेळ किंवा घराबाहेर जाऊन पैसे काढण्यासाठी तुमची परिस्थिती वेगळी असेल तर, चिंता करण्याची काही गरज नाही. कारण की ‘इंडियन पोस्ट पेमेंट बँक’ तुम्हाला घरबसल्या पैसे मिळवून देऊ शकतो. आता तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पैसे काढता येणार आहेत. अनेकांना प्रश्न पडला आहे की ही गोष्ट शक्य आहे का तर, याचे उत्तर होय आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक :
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांच्या सुविधेबद्दल सर्व माहिती लिहिली आहे. वृद्ध तसेच वेळेअभावी तुम्हाला तात्काळ पैशांची गरज भासली तर, घराबाहेर न पडता आणि एटीएममध्ये न जाता आईपीपीबी आधार एटीएम सेवा तुम्हाला घरपोच पैसे आणून देण्यास मदत करणार. आता असा देखील प्रश्न उपस्थित होतो की, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला काही प्रोसेस करावी लागेल का, तर होय. पुढील प्रोसेस जाणून घ्या.
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचे :
तुम्हाला घरबसल्या पैसे मिळवायचे असतील तर, सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बायोमेट्रिकचा वापर करून पैसे मागवू शकता. तुम्हाला जेवढी अमाऊंट हवी आहे तेवढी आधार लिंक अकाउंटमधून कापली जाणार.
IPPB नुसार आधार इनेबिल पेमेंट सिस्टम अशा प्रकारची सुविधा प्रदान करते ज्यामध्ये ग्राहक त्याचे आधार कार्ड एक आयडी प्रूफ वापरू शकते. एवढेच नाही तर आधार कार्डमुळे तुम्हाला बँकेशी जोडल्या असलेल्या काही सुविधांचा देखील लाभ मिळतो.
सुविधांविषयी जाणून घ्या :
1. मिनी स्टेटमेंट
2. बॅलेन्स चेक करणे
3. कॅश विड्रॉल करणे
4. कॅश डिपॉझिट करणे
ही माहिती देखील आहे गरजेची :
AEPS साठी तुमचे AEPS मध्ये बँक अकाउंट लिंक कशी गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड देखील दुसऱ्या बँकेची लिंक असणे महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या तर आहेत परंतु जोपर्यंत तुम्ही बायोमेट्रिक अथेंटिकेशन पूर्ण करत नाही तोपर्यंत तुमचे पैसे काढले जाणार नाहीत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		