15 December 2024 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Suzlon Share Price | बंपर तेजीचे संकेत, सुझलॉन शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मल्टिबॅगर परतावा देणारा सुझलॉन शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन शेअरने 2,963.79% परतावा दिला आहे. सुझलॉन कंपनी संबंधित नवीन अपडेटवर गुंतवणूदारांच लक्ष आहे. याबाबत सविस्तर माहिती आली आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 74.03 रुपयांवर पोहोचला होता.

नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणार का?
बुधवारच्या ट्रेडिंग वेळी सुझलॉन शेअर ९ टक्क्यांहून अधिक वधारला होता. मात्र शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.31 टक्के घसरून 74.45 रुपयांवर पोहोचला होता. हा शेअर 52 आठवड्याच्या उच्चांकी किंमतीच्या जवळ आला आहे. लवकरच सुझलॉन शेअर ही पातळी ओलांडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण टाटा पॉवर कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सुझलॉन एनर्जी कंपनी प्रयत्नशील असल्याची बातमी आहे. टाटा पॉवर कंपनीकडून पवन टर्बाइन पुरविण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, याचा फायदा सुझलॉन शेअरला होणार आहे.

या कॉन्ट्रॅक्टसाठी सुझलॉन कंपनी आघाडीवर
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा पॉवरने पवन टर्बाइनचा पुरवठा करण्यासाठी टेंडर्स काढले आहेत. टाटा पॉवर कंपनीने देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणून या कॉन्ट्रॅक्ट कडे पाहिलं जातंय. या स्पर्धेत सुझलॉन एनर्जी कंपनी सर्वात आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. टाटा पॉवर कंपनीकडून हा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात सुझलॉन कंपनी यशस्वी झाल्यास त्याचा थेट फायदा सुझलॉन शेअरला होणार आहे.

टाटा पॉवर कंपनीकडून हा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सिमेन्स गेम्सा, सेन्व्हियन इंडिया, एन्व्हिजन एनर्जी, सुझलॉन एनर्जी आणि विंड टर्बाइन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने ३ गिगावॅट क्षमतेच्या पवन टर्बाइनपुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत.

सुझलॉन शेअरने किती परतावा दिला
सुझलॉन शेअरने मागील 6 महिन्यात 90.50 टक्के परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने १०२.६८ टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने १८१.६५ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात सुझलॉन स्टॉकने 2,963.79 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x