EPFO Member Login | ईपीएफओ म्हणजेचं कर्मचारी भविष्य निधी संघटन रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींसाठी फायदाच्या योजना प्रोव्हाइड करतात. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना भविष्यासाठी भविष्य निधी म्हणजेच ईपीएफ प्रदान करते. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पगार कापला जातो. जर तुम्ही सुद्धा ईपीएफओमध्ये अकाउंट ओपन केलं असेल आणि तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करायचा असेल तर, तुमच्यासाठी हा लेख अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.
जर तुम्ही ईपीएफओ खातेधारक असाल तर, तुमचा पगार दोन भागांमध्ये डिव्हाइड केला जातो. म्हणजेच तुमच्या पगारातील 12% अमाऊंट ईपीएफमध्ये तर, दुसरा भाग ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये जातो. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या पद्धतीने ईपीएफ बॅलेन्स चेक करता येईल.
अशा पद्धतीने करा ईपीएफओ बॅलन्स चेक :
तुमचा ईपीएफओ बॅलन्स तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अगदी सहजरीत्या चेक करू शकता. त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल फोन किंवा कॉल करून देखील स्वतःचा बॅलन्स चेक करू शकता. ऑनलाइन बॅलन्स चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
1. ऑनलाइन पद्धतीने बॅलन्स चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
2. पुढे पासबुक पोर्टलवर जाऊन UAN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. या प्रोसेसनंतर तुम्हाला जो ईपीएफओ बॅलन्स चेक करायचा आहे त्या पर्यायावर क्लिक करा.
3. आता तुम्हाला पीएफ पासबुक असा दिसणाऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि स्वतःचा बॅलेन्स चेक करून घ्यायचा आहे.
एसएमएस करून बॅलन्स चेक कसा करावा :
एसएमएस पद्धतीने बॅलन्स चेक करायचा असेल तर, UAN नंबर तुमच्या मोबाईलला रजिस्टर असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही 7738299899 या क्रमांकावर एसएमएस करून बॅलन्स चेक करू शकता. या नंबरवर एसएमएस केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या ईपीएफओ बॅलन्सचे सर्व डिटेल्स पाहायला मिळतील. विशेष म्हणजे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेनुसार पुढे जाऊ शकता.
मिसकॉल मारून देखील करता येईल बॅलेन्स चेक :
मिसकॉल मारून बॅलन्स चेक करता येण्याचा पर्याय ऑफलाइन पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचा आहे. ईपीएफओ बँक खात्याला तुमचा जो नंबर रजिस्टर आहे त्या नंबर वरूनच तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्याबरोबर तुमचा फोन कट होईल त्यानंतर तुम्हाला लगेचच एक एसएमएस पाठवला जाईल. या एसएमएसमुळे तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करता येईल.
उमंग ॲपच्या सहाय्याने करा बॅलन्स चेक :
उमंग आजच्या साह्याने बॅलन्स चेक करणे हा ऑनलाइन बॅलन्स चेक करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला पर्याय मानला गेला आहे.
1. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उमंग ॲप डाऊनलोड करावा लागेल.
2. एप्लीकेशन उघडल्याबरोबर तुम्हाला ईपीएफओचं एक वेगळं सेक्शन पाहायला मिळेल.
3. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि UAN नंबर टाकून लॉगिन करावे लागेल.
4. आता तुम्हाला तुमचा ईपीएफओ बॅलन्स चेक करता येईल. तर, अशा पद्धतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा बॅलन्स अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकता.