2 May 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअर 60% घसरून स्वस्त झालाय, आता कंपनीची धमाकेदार ऑफर, शेअरवर पॉझिटिव्ह परिणाम?

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ च्या शेअर्समध्ये पडझड काही थांबत नाही. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 2.30 टक्के घसरण झाली होती. सुरुवातीच्या काही तासात ‘झोमॅटो’ 50.90 रुपयांपर्यंत पडला होता. मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव वाढला आहे. शेअरची किंमत मागील एका वर्षात 50 टक्क्यांनी पडली आहे. जुलै 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 126 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून शेअरची किंमत 60 टक्के कमजोर झाली आहे. तथापि अनेक ब्रोकरेज फर्म या स्टॉकबाबत सकारात्मक असून त्यांनी कमी किमतीवर शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

स्टॉक पुन्हा चर्चेत येण्याचे कारण :
‘झोमॅटो’ कंपनीच्या शेअरने आपल्या ग्राहकांसाठी लॉयल्टी प्रोग्राम परत लाँच केला आहे. कंपनीने आपला लॉयल्टी प्रोग्रॅम ‘Zomato Gold’ रीलॉंच केल्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत कंपनी आल्या युजर्सना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना ‘Zomato Gold’ सेवा तीन महिन्यांसाठी केवळ 149 रुपये किमतीवर ऑफर केली आहे. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहक 10 किमीच्या परिघातील सर्व रजिस्टर असलेल्या रेस्टॉरंटमधून अमर्यादित मोफत डिलिव्हरीचा लाभ घेऊ शकतात. ‘झोमॅटो’ कंपनीचे ग्राहक ज्यांच्याकडे एडिशन कार्डसह प्रो किंवा प्रो प्लस सदस्यत्व आहे, त्यांना ‘Zomato Gold’ या प्रोग्राम अंतर्गत 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत लाभ घेता येईल. ब्रोकरेज फर्मच्या मते या प्रोग्रामचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळेल.

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
झोमॅटो गोल्ड प्लॅन नवीन ग्राहकांना आकर्षित करेल असा विश्वास एडलवाईस फर्मने व्यक्त केला आहे. हा प्लॅन खूप स्वस्त असल्याने कंपनीला याचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. अलीकडील आर्थिक निकालांमधून असे समजले आहे की, झोमॅटो कंपनीने स्विगीपेक्षा जास्त बाजार काबीज केला आहे. शेअरमधील उच्च वाढ आणि नफा यांचा सातत्यपूर्ण समतोल गुंतवणूकदारांना उत्साही ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकबर 85 रुपये लक्ष किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x