
EPFO Passbook | प्रायव्हेट म्हणजेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओ अंतर्गत बऱ्याच सुविधा प्रदान केल्या जातात. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन. संघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व वर्गातील कर्मचारी ईपीएफओच्या प्रत्येक सुविधेस पात्र असतात.
ईपीएफओ खात्यात प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक भाग जमा केला जातो. या जमा रक्कमेवर सरकारकडून प्रतिवर्ष 8.1% व्याज देखील दिले जाते. खाजगी आणि संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचा आयुष्य सुखद करता याव यासाठी ही संस्था काम करते. त्यामुळे, तुम्हाला 25,000 हजार पगार असेल तर, निवृत्तीनंतर तुम्हाला किती पैसे मिळतील त्याचा संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहून घेऊ.
25,000 पगार असेल तर, EPF ची किती रक्कम जमा होईल पहा :
समजा एखाद्या कर्मचाऱ्याला 25000 प्रतिमहा पगार मिळत असेल तर, निवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा होऊ शकते.
वय 25 वर्ष आणि पगार 25,000 रुपये :
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं वय 25 वर्ष आहे आणि त्याला प्रत्येक महिन्याला 25000 पगार मिळत आहे. जर या व्यक्तीला प्रत्येक वर्षाला 5% ने पगार वाढ मिळत असेल तर, 60 व्या वर्षात 1,95,48,000 करोड रुपये ईपीएफ खात्यात जमा होतात.
वय 30 वर्ष आणि पगार 25,000 रुपये :
समजा एखाद्या व्यक्तीची बेसिक सॅलरी 25 हजार रुपये आहे आणि त्याचं वय 30 वर्ष आहे तर, प्रत्येक वर्षाला पगारात 7% ने वाढ होत असेल तर, 60 यावर्षी कर्मचाऱ्याला 1,56,81,500 रुपयांचा बक्कळ फायदा मिळेल.
ईपीएफ फंडाविषयी ही बेसिक माहिती जाणून घ्या :
कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यातील वाढता बॅलन्स हा केवळ कर्मचाऱ्याचा बेसिक पगार, वर्षाला किती टक्क्यांनी पगार वाढ होते त्याचबरोबर त्यांचं सध्याचं वय या तीन गोष्टींच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या खात्यातील पीएफ बैलेंस ठरत असतो. ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्याच्या मूळ पगारातील 12% भाग जमा केला जातो. कर्मचाऱ्याइतकेच योगदान कंपनीकडून देखील केले जाते. त्यामुळे पीएफ खात्यातील बॅलेन्स केवळ या तीन गोष्टींवरून ठरवले जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.