 
						Free Home Loan | बहुतांश व्यक्ती स्वतःचा प्लॉट खरेदी करण्यासाठी एक रक्कम पैसे भरण्याऐवजी लोन काढून घर घेणे पसंत करतात. प्रत्येकाकडे एकच वेळेला एवढी मोठी रक्कम तयार नसते. त्यामुळे सॅलरी मॅनेजमेंट आणि इतर खर्च सांभाळून होम लोनसाठी विचार करून घर ताब्यात घेऊन प्रत्येक महिन्याला कर्ज फेडतात.
समजा एखाद्या व्यक्तीने 25 वर्षांसाठी 9.5% टक्क्यांच्या व्याजदराने 60 लाख रुपयांचं लोन काढलं असेल तर, त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 52,422 रुपयांचा EMI भरावा लागेल. एकूण 25 वर्षांत एवढ्या मोठ्या रक्कमेचं कर्ज फेडता फेडता तुम्हाला फक्त व्याजाचे 97,26,540 रुपये जास्तीचे करावे लागतील. म्हणजेच तुमचं 60 लाखांचं घर 1.57 करोड रुपयांवर येऊन पोहोचेल. या कारणामुळे बरेच व्यक्ती कर्जामध्ये डुबून जातात परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही एका सोप्या पद्धतीने तुमचं होम लोन मोफत करू शकता.
होम लोनसह SIP देखील सुरू करा :
तुम्हाला 25 वर्षानंतर व्याजदरानुसार 52,422 रुपये प्रत्येक महिन्याला EMI स्वरूपात भरावे लागतात. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या EMI मधील 11% म्हणजे 5,700 रुपये SIP मध्ये गुंतवले तर, 25 वर्षांत तुम्ही 97,26,540 एवढ्या होम लोनचा रक्कमेतून 92,11,964 एवढे रुपये वसूल करता येतील.
25 वर्षांत कमवाल 1.09 कोटींची रक्कम :
तुम्ही होम लोनसह SIP करण्याचा विचार केला असेल तर, 5,766 रुपयांच्या SIP मधून 12% सरासरी वार्षिक व्याजातून 17,29,800 रुपये जमा होतील. ही रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला 25 वर्षांचा कार्यकाळ लागेल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 92,11,964 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच एकूण कॉर्पस फंड 1.09 कोटी रुपये तयार होतील. दरम्यान तुम्ही 26 वर्षांचे कॅल्क्युलेशन करत असाल तर, 26 वर्षांत तुमच्या खात्यात 1,06,04,320 रुपयांचा परतावा मिळेल. यासाठी तुम्हाला 1 वर्षासाठी खंड एक्सटेंड करून घ्यावा लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		