
Smart Investment | नुकताच 2025 हे नववर्ष सुरू झालं आहे. बऱ्याच व्यक्ती नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करू पाहण्याचा संकल्प निर्धारित करतात. यामध्ये विद्यार्थी वर्ग आपल्या शैक्षणिक वृत्तीकडे वाटचाल करतात तर, कार्पोरेट विश्वात काम करणाऱ्या व्यक्ती कामामध्ये स्वतःची चांगली छाप पाडण्याचा प्रयत्न करतात.
कौटुंबिक व्यक्ती एखाद्या चांगल्या आणि जास्त परतावा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये देखील गुंतवणूक करून वर्षाची सुरुवात करतात. जेणेकरून पैसे मोजण्यासाठी आपल्याला तारीख आणि वर्ष व्यवस्थितपणे लक्षात राहतील. बचत करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. बचतीशिवाय तुमचं भविष्य शून्यात जमा आहे. तुम्ही सुद्धा नवीन वर्षात बचतीचा प्लॅन करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही चक्क 2 वर्षांत 2 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम तयार करू शकता.
गुंतवणुकीचे बेस्ट ऑप्शन :
1. गुंतवणुकीच्या बेस्ट ऑप्शनबद्दल सांगायचे झाले तर, म्युच्युअल फंड एसआयपी तुमच्यासाठी अत्यंत कमालीचे गुंतवणुकीचे साधन ठरू शकते.
2. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचं आपले पैसे गुंतवून दुप्पटीने परतावा कमवला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे सातत्य ठेवावे लागते.
3. SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही एकदम सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट केली म्हणजेच गुंतवणुकीचे सातत्य दीर्घकाळापर्यंत ठेवले तर, लवकरात लवकर तुम्ही करोडपती बनू शकता.
4. SIP गुंतवणुकीची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये तुमच्या बजेटप्रमाणे आणि महिना खर्चाचा विचार करून एक ठराविक रक्कम बाजूला काढून उरलेली कमी रक्कम देखील गुंतवू शकता. तुम्ही अगदी 100 ते 500 रुपयांपासून देखील एसआयपी सुरू करू शकता.
दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल :
समजा एखादा गुंतवणूकदार म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दररोज 10 रुपयांची बचत करत असेल तर महिन्याला 300 रुपये जमा होतात. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 300 रुपयांची गुंतवणूक सातत्याने 35 वर्ष सुरू ठेवली तर, तुमच्या खात्यात एकूण 1.1 कोटी रुपयांची रक्कम जमा होईल. एसआयपी तुम्हाला प्रत्येक वर्षाला 18% दरानुसार व्याजदर प्रदान करू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.