1 May 2025 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठी तर खेड'मध्ये जगबुडी नदीची पातळी वाढली

Konkan, Chiplun, Rajapur, vashishta river, Heavy Rain

रत्नागिरी : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलय झाला आहे. राजापूर शहरात पाणी भरले असून चिपळुणातील वाशिष्ठी नदीचेपाणी वाढू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत शाळा सोडून देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर आजही सुरू असून सायंकाळी चार वाजल्यापासून खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद करावा लागला आहे. त्यामुळे भरणे नाक्यापासून दुतर्फा वाहनांची रांग लागली आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रचंड पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु खेडमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने पुलाच्या पाण्याच्या पातळी खाली येताच वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे. शाळा महाविद्यालये सोडून देण्यात आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षितस्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. त्यामुळे शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता शिवाजी पथ, मछीमार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Konkan(43)#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या