11 May 2025 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राणेंच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते; मुख्यमंत्र्यांची मात्र टाळाटाळ

NCP President Sharad Pawar, MP Narayan Rane, MLA Nitesh Rane, Maharashtra Swabhiman Party, Former MP Nilesh Rane, CM Devendra Fadanvis, Chief minister Devendra Fadanvis, no holds barred biography

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी ‘नो होल्ड्स बार्ड’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार होते. मात्र, पुस्तक प्रकाशनाला ते टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे राणेंच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. १६ ऑगस्टला या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री टाळाटाळ का करत आहेत?
नारायण राणे यांनी आत्मचरित्रामध्ये शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घ्यायची नाही, यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ देत नाही आहेत. युतीमधील भांडणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजपने लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये देखील युती केली आहे. त्यामुळे या युतीमध्ये कोणताच दुरावा पुन्हा येऊ नये याची मुख्यमंत्री काळजी घेत असल्याकारणाने पुस्तक प्रकाशनाला टाळाटाळ करत आहेत. नारायण राणे यांना हे आत्मचरित्र विधानसभा निवडणूकीच्या आधी प्रकाशित करायचे आहे.

नेमकं आहे तरी काय आत्मचरित्रामध्ये?
या आत्मचरित्रामध्ये, ‘जर नारायण राणे पक्षात राहिले तर मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून मला त्या पदावर नेमण्यात आले म्हणून त्यांच्या मनात माझ्या बद्दल राग होता. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले, असा दावा देखील नारायण राणेंनी या आत्मचरित्रामध्ये केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या