5 August 2021 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
x

शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन

BJP Leader Girish Mahajan

जळगाव, १८ जून | राम मंदिराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी घणाघाती टीका केली आहे. श्रीराम जन्मीभूमीतील मंदिर पूर्ण होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना प्रयत्न करीत आहे. आता तर ‘शिवसेनेने, काँग्रेस एमआयएमच्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे,’ अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काल भारतीय जनता पार्टीची बैठक जळगाव वसंत स्मृती कार्यालयात झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आ.महाजन म्हणाले की, ‘राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे. काल जे झाले ते अतिशय वाईट आहे. शिवसेना आपल्या मुख्य तत्वापासून बाजूला जाऊन अशी भरकटेल असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता.’

काँग्रेस आणि एमआयएमच्या पुढे जात शिवसेनेने हिंदुत्वाविरोधी काम करण्यास सुरुवात केली असे वाटायला लागले आहे. प्रभू श्री रामचंद्र हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांचे मंदिर व्हावे म्हणून संपू्र्ण देशाने, मुस्लिमांनीही त्याचे स्वागत केले आहे. मात्र, हे शिवसैनिक वाटेल तसे तोंडसुख घेत आहेत. त्यांनाही माहीत आहे, विषय काय आहे? पण विरोधाला विरोध करावा म्हणून कुठल्याही विषयावर बोलायचे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. इतकी अधोगती शिवसेनेची कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत,’ असा टोलाही महाजन यांनी यावेळी लगावला.

राम मंदिरावरुन काल भारतीय जनता पक्षाचा मोर्चा गेला असता, सर्व शिवसैनिक तेथे जमले आणि त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. सर्वांनी ते पाहिले आहे. कुणी विरोधात बोलले तर आम्ही त्याचे उत्तर गुद्दयाने देऊ, लाठीकाठीने देऊ ही भूमिका सत्ताधारी शिवसेनेची झाली आहे आणि ती चुकीची आहे,’ असंही महाजन यांनी सांगितलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP leader Girish Mahajan criticized Shivsena and compared with MIM news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(655)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x