11 December 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील अपक्षांना पहिल्या फेरीत मानाचं पान नाही | तर जुने शिवसैनिक नसलेल्या केसरकर-सत्तारांना वेटिंग

Maharashtra State

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची माहिती समोर आली आहे. उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ज्या आमदार, नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा नेत्यांना फोन करण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तातडीने बोलावण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी उद्या सकाळी बैठक होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

या पहिल्या टप्प्यातून मात्र, अपक्ष आमदारांना वगळण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या एकाही अपक्ष आमदाराचा पहिल्या टप्प्यात शपथविधी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा शपथविधी सोहळा होणार की नाही यावरून चर्चा रंगली आहे. अधिवेशन झाल्यानंतर अपक्षांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे, २०१४ मधून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांना संधी देण्यात आली असली तरी दीपक केसरकर आणि अब्दूल सत्तार यांना सध्या लांब ठेवण्यात आलं आहे.

भाजपकडून आतापर्यंत गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांना निरोप देण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. संजय शिरसाट हे औरंगाबादहून मुंबईला निघाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra State Shinde Government cabinet expansion check details 08 August 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra State(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x